गिरीश महाजन म्हणाले; कोकाटे यांचे मंत्री पद बदलवण्याचा सर्वस्वी निर्णय हा अजित पवार यांचा आहे. त्यांचे कृषी खात काढून त्यांना क्रीडा खात देण्यात आलेले आहे.
धनंजय मुंडे आणि फडणवीसांची भेट झाली त्यावर गिरीश महाजन म्हणाले, धनंजय मुंडे हे आमदार आहेत. त्यांनी काही कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली असेल. असं नाही की, फक्त मंत्रिपदासाठी भेट घेतली असावी. कोणाशी बोलताना सांभाळून बोलले पाहिजे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना तो मंत्र्यांना सूचना देण्याचा अधिकार आहे.
लाडकी बहीण योजनेबद्दल, मला वाटतं या खात्यामध्ये असं नाही आहे कि, निधी वळवला जातो पुन्हा त्या खात्यामध्ये निधी दिला जातो.
ही टेक्निकल बाब आहे. एखाद्या खात्यामधून सर्व काही पैसे काढून घेतले जातात. असं काही होत नाही पुढे एडजस्टमेंट झाली की, त्या खात्यामध्ये पैसे टाकले जातील. हा निर्णय वित्त मंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. कोणावर संज्ञा होणार नाही, ज्या ज्या खात्यावर बजेट ठरलेला आहे. त्या त्या खात्याला तेवढे पैसे मिळणार आहेत असे महाजन यांनी सांगितले.
३१ जुलै रोजी मालेगाव बॉम्बस्फोट निकाल देण्यात आला त्याबद्दल गिरीश महाजन म्हणाले, भगवा दहशतवाद, भगव्याचा दहशतवाद असा आरोप करत काँग्रेसच्या काळात गोवण्यात आलं होतं. यामध्ये आठ दहा वर्ष त्या लोकांना खूप त्रास झाला, मात्र या संदर्भातला कुठलाही पुरावा त्या ठिकाणी नव्हता. न्यायालयाने त्यांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे. आणि हा निर्णय स्वागतार्ह आहे.