अकोला : काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांचा विद्युत विभागाच्या अधीक्षक अभियंता यांना दिला इशारा

 अकोला : काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांचा विद्युत विभागाच्या अधीक्षक अभियंता यांना दिला इशारा
  • MG News
  • मे 21 2025

Share on  

 अकोला :  काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांचा विद्युत विभागाच्या अधीक्षक अभियंता यांना दिला इशारा

       अकोला शहरातल्या पश्चिम मतदार संघात गेल्या काही दिवसांपासून शहरातील हवा पाणी आल्यास अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढतच चालला आहे. तर एकप्रकारे अघोषित लोडशेडींग सुरू होण्याच्या या प्रकाराने नागरिक वेठीस धरल्या जात आहे, आगामी काळात लवकरच मान्सून दाखल होणार आहे. तर मान्सून पूर्व मेंटेनन्स ची कामे सुद्धा महावितरणच्या वतीने सुरू आहे. मात्र वारा, वादळ, पाऊस सुरू झाल्यास अचानक विद्युत पुरवठा खंडित होऊन जातो.  तर काही ठिकाणी शहरात सध्या व्होल्टेजची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे. तर अनेक परिसरात गोड पाण्याचे नळ येण्याच्या वेळी लाइन बंद होऊन जाते, परिणामी अनेक नागरिकांना पाण्यविनाच राहावे लागते. तर अनेक ठिकाणी रुग्णालय परिसरात सुद्धा अघोषित लोडशेडींग होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर परिणामी लवकरात लवकर ही समस्या दूर करावी. अन्यथा महावितरण कार्यालयातील वीजपुरवठा खंडित करीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आ. पठाण यांनी यावेळी अधीक्षक अभियंता अजितपाल दिनोरे यांना दिला आहे.

संबंधित बातम्या