अकोला : जन सत्याग्रह संघटने कडून दहशतवाद्यांचा पुतळा जाळून निषेध .

अकोला : जन सत्याग्रह संघटने कडून दहशतवाद्यांचा पुतळा जाळून निषेध .
  • MG News
  • मे 3 2025

Share on  

अकोला : जन सत्याग्रह संघटने कडून दहशतवाद्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर जन सत्याग्रह संघटनेने आज संध्याकाळच्या सुमारास बस स्टँड चौकात दहशतवादाचा पुतळा जाळत जोरदार निदर्शने केली आहे. तर जन सत्याग्रह संघटनेने सरकारकडे मागणी केली आहे की, या हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जावी. तसेच त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी. व हल्ल्यानंतर कोणताही अतिरेकी पकडला न जाणे. ही सुरक्षा यंत्रणांची गंभीर चूक असून, त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी ही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

 आसिफ खान (जिल्हाध्यक्ष जन सत्याग्रह संघटन)

संबंधित बातम्या