सातपुर गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी शुभम निकमला अंबड गुन्हे शाखेने गाठले

सातपुर गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी शुभम निकमला अंबड गुन्हे शाखेने गाठले
  • MG News
  • ऑक्टोबर 26 2025

Share on  

 सातपुर येथील गोळीबार प्रकरणातील सराईत आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने दाखवलेल्या शिताफीमुळे शुभम चंद्रकांत निकम (वय २५, रा. पाथर्डी गाव, नाशिक) यास शनिवारी (दि. २६ ऑक्टोबर २०२५) दुपारी १ वाजता ताब्यात घेण्यात आले.

शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी व सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी अंबड गुन्हे शाखेची स्थापना केली आहे. पथकाला फरार व पाहीजे असलेल्या आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पथकातील अधिकारी पो.ना. भुषण सोनवणे, पो.अं. चारूदत्त निकम, पो.अं. भगवान जाधव यांना शुभम निकम हा नाशिकमध्ये असल्याची गुप्त माहिती मिळाली.

यानंतर पथकाने गौळाणे रोड परिसरात सापळा रचून मोठ्या शिताफीने शुभम निकमला पकडले. चौकशीत त्याच्यावर सातपुर पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न (गु.र.नं. ३१३/२०२५) या गंभीर गुन्ह्याचा पाहीजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

अटक केलेला शुभम निकम हा सातपुर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असून, त्यास पुढील कारवाईसाठी सातपुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक,
उप आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण,
परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त श्री. किशोर काळे,
सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप मिटके,
अंबड विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शेखर देशमुख.

कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार:
वपोनि. जग्वेंद्रसिंग राजपूत,
पोउनि. मोतीलाल पाटील,
श्रे.पोउनि. दिलीप सगळे,
पो.हवा. प्रकाश बोडके, योगेश चव्हाण,
पो.ना. भुषण सोनवणे,
पो.अं. चारूदत्त निकम, भगवान जाधव (अंबड गुन्हे शाखा).

 अंबड गुन्हे शाखेची ही कारवाई नाशिक पोलिसांच्या गुन्हे प्रतिबंधक कार्यक्षमतेचे आणखी एक उदाहरण ठरले आहे.

संबंधित बातम्या