अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील अंगणवाडी क्र. १ मधील बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नव्याने बांधकाम करण्यात आल्यापासून अंगणवाडीत ठिकठिकाणी स्लॅब मधून गळती व स्लॅबचे पापोडे निघत असल्यामुळे चिमुकल्यांना दरवर्षी पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्याने विद्यार्थ्यांना अंगणवाडीत बसता येत नाही. विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागत आहे. अंगणवाडीत पाणी साचत असल्याने या प्रकारामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. या घटनेने अंगणवाडीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाले आहे. अनेक वेळा गावातील सरपंच व ग्रामसेवकांना सांगूनही व वरिष्ठांनाही माहिती कळवली असता अद्याप याकडे कुठलेही अधिकारी फिरकले नाही, असे शाळेतील शिक्षिका व गावातील नागरिकांनी म्हंटले आहे. शाळेची पूर्णपणे दुरवस्था झालेली असून जीवितहानी झाल्यास त्याला कोण जबाबदार ? असा सवाल उपस्थित होत आहे. शाळा तात्काळ दुरुस्थ करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.