अमरावती : भारतीय आर्मी, नेव्ही व एअर फोर्सच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन

अमरावती : भारतीय आर्मी, नेव्ही व एअर फोर्सच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन
  • MG News
  • मे 18 2025

Share on  

अमरावती : भारतीय आर्मी, नेव्ही व एअर फोर्सच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन 

      भारतीय आर्मी, नेव्ही व एअर फोर्सच्या सन्मानार्थ अमरावतीत आज भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. भाजप व समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या या रॅलीस शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजकमल चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करत रॅली जयस्तंभ चौकात पोहोचली. तेथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, माजी खासदार व भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. याशिवाय अनेक माजी सैनिक व शहरातील शेकडो नागरिक तिरंगी झेंडे व पोस्टर्स घेऊन सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. 

संबंधित बातम्या