अमरावती : अमरावती  हादरले ! इंस्टाग्राम पोस्टवरून २३ वर्षीय युवकाची हत्या

अमरावती : अमरावती  हादरले ! इंस्टाग्राम पोस्टवरून २३ वर्षीय युवकाची हत्या
  • MG News
  • मे 8 2025

Share on  

अमरावती : अमरावती  हादरले ! इंस्टाग्राम पोस्टवरून २३ वर्षीय युवकाची हत्या.

 इंस्टाग्रामवरील वादातून तरुणाची निर्घृण हत्या, चार आरोपींना अटक, चार विधिसंघर्षित बालकांचा सहभाग

अमरावती | राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोपाल नगर परिसरात मंगळवारी रात्री 23 वर्षीय देवांशू अनिल फरकाडे याची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, चार विधिसंघर्षित बालकांचा यात सहभाग असल्याचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी माहिती दिली.

या प्रकरणातील अटकेत आलेले आरोपी म्हणजे:

  • राज आठवले (वय 20)

  • हर्षल जाधव (वय 18)

  • ओम खडसे (वय 18)

  • हर्षल पावडे (वय 18)

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राज आठवले याने मृतक देवांशू फरकाडे यांच्या इंस्टाग्रामवरील पोस्टवर अश्लील आणि चिडवणारे कमेंट्स केले होते. याविरोधात देवांशू फरकाडे यांनी राज आठवले याच्या घरी जाऊन त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या भेटीदरम्यान वाद उफाळून आला आणि मंगळवारी रात्री राज आठवलेसह एकूण आठ जणांनी देवांशूवर चाकू, लाठी-काठी आणि दगडांनी अमानुष हल्ला केला. यात देवांशूचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना 10 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य चार विधिसंघर्षित बालकांबाबतही आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही महत्त्वाची कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त भवर, राजापेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक पुनीत कुलट, पीएसआय हिवरे आणि डीबी पथकाने केली.

पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांचा प्रतिक्रिया :

"इंस्टाग्रामवरील किरकोळ वादामुळे एक जीव गमवावा लागला ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. संबंधित आरोपींना कठोर शिक्षा मिळेल, यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे."

संबंधित बातम्या