अमरावती : भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याने आंबेडकर पिता-पुत्र दुखी – राजेंद्र गवईंची टीका
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर टीका केल्या नंतर याला भूषण गवई यांचे बंधू व रिपाई गवई गटाचे नेते डॉ.राजेंद्र गवई यांनी प्रत्युत्तर दिलं,प्रकाश आंबेडकर यांनी नेहमी यांचा रासू गवई यांना विरोध केला. तर सुजात आंबेडकर हे भूषण गवई यांचा विरोध करत आहे, भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याचं सुजात व प्रकाश आंबेडकर या बापलेकाला दुःख झाल्याचं नवल मला वाटत नाही..2019 व 2024 च्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांची लोकप्रियता संपत चालली आहे,त्यामुळे आंबेडकर पिता पुत्राला दुर्लक्ष करा अशी टीका राजेंद्र गवई यांनी सुजात आंबेडकर यांच्यावर केली.