अमरावती  : शिराळा गावातील कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण; अतिक्रमण हटवण्याची मागणी

अमरावती  : शिराळा गावातील कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण; अतिक्रमण हटवण्याची मागणी
  • MG News
  • मे 20 2025

Share on  

  अमरावती  : शिराळा गावातील कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण; अतिक्रमण हटवण्याची मागणी

         अमरावती च्या शिराळा येथील एका मुस्लिम कुटुंबातील  महिला नसरीन बानो व त्यांच्या चार सुनांनी आपल्या लहान मुलांसह अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

त्यांचा आरोप आहे की, शिराळा ग्रामपंचायतीतील भाजपाचे सदस्य श्यामुद्दीन मुन्निरुद्दीन व त्यांच्या तीन भावांनी गावातील मुख्य सार्वजनिक रस्त्यावर अवैध बांधकाम करून रस्ता अडवला आहे. या अतिक्रमणामुळे परिसरातील अनेक कुटुंबांचा रोजचा व्यवसाय ठप्प झाला असून, नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत, तहसील कार्यालय आणि जिल्हा परिषद स्तरावर वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. उलट, संबंधितांचे अवैध बांधकाम सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “रस्ता हा सार्वजनिक आहे. तो अडवल्यामुळे आमचा व्यवसाय बंद झाला असून उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे,”असे नसरीन बानो यांनी सांगितले. सरकारी रस्ता मोकळा करून अतिक्रमण त्वरित हटवावे, या मागणीसाठी हे उपोषण सुरू असून, न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या