अमरावती : रखरखत्या उन्हात शिवसेनेच्या नेतृत्वात महिलांचा नांदगाव नगर पंचायतवर धडकला घागर मोर्चा
अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चांदी प्रकल्पात मुबलक पाणी साठा असतांना सुद्धा नगर पंचायतचे नियोजना अभावी 10 ते 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने भीषण पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना बसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी नगर पंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांना घेराव करुन कार्यालयातच घागरी फोडून महिलांनी संताप व्यक्त करत नियमित पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी घाघर मोर्चा काढण्यात आला.
प्रकाश मारोटकर