अमरावती : अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील शेतीतील पिकांना मोठा फटका

अमरावती : अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील शेतीतील पिकांना मोठा फटका
  • MG News
  • मे 18 2025

Share on  

अमरावती : अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील शेतीतील पिकांना मोठा फटका

       काल पडलेल्या अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अंजनगाव बारी परिसरासह अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने काढणीला आलेला कांदा तसेच साठवून ठेवलेला कांदा पूर्णतः खराब झाला.

कांद्याबरोबरच संत्रा बागा, ज्वारी, आणि भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेतला जात आहे.

 

 

 

संबंधित बातम्या