जळगाव रेल्वे स्थानकावर अमृत भारत एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत

जळगाव रेल्वे स्थानकावर अमृत भारत एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत
  • MG News
  • सप्टेंबर 30 2025

Share on  

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ब्रम्हपूर – उधना (सुरत) अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेचे उद्घाटन आज पार पडले. उद्घाटनानंतर जळगाव रेल्वे स्थानकावर या रेल्वे गाडीचे उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.

जळगाव लोकसभेतील अमळनेर, धरणगाव व जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्यामुळे प्रवासी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या महत्त्वाच्या सोयीबद्दल नागरिकांतर्फे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदीजी, रेल्वेमंत्री मा.श्री.अश्विनी वैष्णवजी तसेच राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीसजी यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

यावेळी रेल्वे स्थानक परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. विद्यार्थी, प्रवासी संघटना, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.

अमृत भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून पाच राज्यातून प्रवास करण्यासाठी नागरिकांना अधिक जलद, सोयीस्कर आणि सुरक्षित होणार असून, सर्वसामान्य कुटुंबांच्या प्रवासाला मोठी गती मिळणार आहे. या गाडीतून कमी व मध्यम उत्पन्न गटातील प्रवाशांसाठी परवडणारी सुविधा उपलब्ध होणार असल्याने रेल्वे प्रवासाला नवा आयाम लाभणार आहे.


एमजी न्यूज ज्ञानेश्वर सावळे जळगाव

संबंधित बातम्या