धोत्रीत आढळला तब्बल आठ फूट लांबीचा अजगर

धोत्रीत आढळला तब्बल आठ फूट लांबीचा अजगर
  • MG News
  • ऑक्टोबर 26 2025

Share on  

दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री गावामध्ये तब्बल आठ फूट लांबीचा अजगर आढळला आहे. सर्पमित्रांनी अजगराला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले आहे. या अजगराचे वजन सात किलो ६०० ग्रॅम इतके आहे. धोत्री येथील गोकुळ शुगर कारखाना परिसरात असलेल्या वन विभागाच्या जागेत कारखान्याचे कर्मचारी विद्रवान गजधाने हे उपाहारगृहात जात होते. त्यावेळी त्यांना काही तरी हालचाल करत असल्याचे दिसून आले. जवळ जाऊन पाहिले असता तो अजगर असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी याची माहिती गावातील सर्पमित्रांना दिली. सर्पमित्रांनी वन विभागाचे कर्मचारी बसवराज हिरोळे यांच्या ताब्यात अजगराला सोपविले.

दरम्यान,अजगराला पकडण्यासाठी सर्पमित्र गेले असता तो आक्रमक झाला होता. त्यामुळे अगदी सुरक्षितपणे पकडणे गरजेचे होते. सर्पमित्र प्रशिक्षित असल्याने त्यांनी काही वेळातच अत्यंत शिताफीने अजगराला पकडले. हा अजगर ८ फूट लांब, तर सात किलो ६०० किलोग्रॅम इतका वजनाचा होता.सर्पमित्र नागनाथ बिराजदार, अमोल बिराजदार, मल्लिकार्जुन हिरोळे यांनी या बचाव कार्यात सहभाग घेतला.

संबंधित बातम्या