वंचितांचा आवाज समाजात पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केले - देवेंद्र फडणवीस

वंचितांचा आवाज समाजात पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केले - देवेंद्र फडणवीस
  • MG News
  • ऑगस्ट 1 2025

Share on  

 अण्णाभाऊ साठे हे एक असं नाव आहे ज्यांनी आपल्या लेखणीने अनेकांच्या रक्तात स्फुलिंग जागृत करण्याचं काम केलं. जगाच्या अनेक देशांमध्ये त्यांचं साहित्य वाचलं जातं, प्रकाशित केलं जातं. तसेच  संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी आपल्या गीतांनी या चळवळीला आगीचे स्वरूप करून दिलं. खऱ्या अर्थाने वंचितांचा आवाज समाजात पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केले आहे.  पृथ्वी ही शेश नागाच्या डोक्यावर नाही, तर कामगारांच्या तळहातावर असल्याचा संदेश देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

संबंधित बातम्या