पामबीच रोडवर पुन्हा अपघात, ट्रक आणि कार एकमेकांना धडकल्या

पामबीच रोडवर पुन्हा अपघात, ट्रक आणि कार एकमेकांना धडकल्या
  • MG News
  • जुलै 29 2025

Share on  

नवी मुंबईतील पामबीच रोडवर आज सकाळी साडेसहा वाजता पुन्हा एकदा अपघाताचा थरार पाहायला मिळाला. ट्रक आणि कार एकमेकांना धडकून दोन्ही गाड्यांचे चालक जखमी झाले असून, त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कार चालकाच्या चुकीमुळे अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, याबाबत अधिक तपास वाहतूक पोलिस करत आहेत.

संबंधित बातम्या