मालमत्ता मूल्यांकनात महानगरपालिकेस आर्थिक फायदा व्हावा यासाठी मनमानी फेरबदल

मालमत्ता मूल्यांकनात महानगरपालिकेस आर्थिक फायदा व्हावा यासाठी मनमानी फेरबदल
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

  धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने धुळे महानगरपालिकेच्या महासभेत ठराव करून स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीला धुळेकरांच्या मालमत्तांचे मूल्यांकन करण्याच्या संदर्भात ठेका देण्यात आला.  सदर कंपनीला १६ कोटी रुपये देऊन हा ठेका देण्यात आला होता. संबंधित ठेकेदाराने संपूर्ण धुळे शहरातील व तसेच महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व ११ गावांच्या मालमत्तांचे मूल्यांकन करताना चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन करून मनपाचा आर्थिक फायदा व्हावा यासाठी सदर ठेकेदाराने हे सर्व कृत्य केलं असल्याचा आरोप ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

धुळे महानगरपालिकेचे सर्व कर दाते हे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक असून एक प्रकारे महानगरपालिकेचा फायदा करून देण्यासाठी धुळेकरांना आर्थिक नुकसान पोहोचविण्याचे काम या कंपनीने जाणून बुजून केलेले आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत संबंधित ठेकेदारा विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी धुळे मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांना ठाकरे सेनेच्या वतीने घेराव घालण्यात आला.

संबंधित बातम्या