राज्यात महायुतीचे सरकार प्रभावीपणे चालवण्यासाठी मंत्र्यांचे ऑडिट होणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केले आहे. "आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागलो आहोत. गडचिरोली जिल्ह्यात स्वतः लक्ष घालून चांगला परफॉर्मन्स देणार," असेही त्यांनी सांगितले.