बळीराजा हिरमुसला, पिक विमा योजनेत चार मोठे बदल

बळीराजा हिरमुसला, पिक विमा योजनेत चार मोठे बदल
  • MG News
  • जुलै 30 2025

Share on  

राज्यातील शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेकडे पाठ फिरवली असल्याचेचित्र बघायला मिळाले आहे. पिक विमा भरण्याची मुदत संपायला आली तरी राज्यात केवळ २० ते २२% शेतक-यांनी पिक विमा भरल्याची माहिती समोर आली आहे. तर परभणीत 'मी पिक विमा भरणार नाही' अशी चळवळच शेतकऱ्यांनी चालू केली आहे.

राज्यसरकारने दोन वर्ष एक रुपयात पिक विमा देण्याची योजना सुरू ठेवल्यानंतर यावर्षी सरकारनं ही योजना बंद करून नव्याने पंतप्रधान पीक विमा योजना आणली. मात्र ज्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. पीक विमा भरण्याची मुदत संपत आली तरीही केवळ राज्यात १ कोटी २७ लाख ३९ हजार २५७ हेक्टर पैकी केवळ ३६ लाख ५४ हजार हेक्टर एवढ्याच क्षेत्राचा विमा २९ जुलै पर्यंत काढण्यात आला आहे. म्हणजेच ज्याची टक्केवारी २० ते २२ टक्के एवढ्या शेतकऱ्यांनीच पीक विमा भरला असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, पुढे आलेल्या माहितीनुसार, शासनाने या योजनेत अनेक बदल केल्याने शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. परभणीत तर काही शेतकऱ्यांनी मी पीक विमा भरणार नाही अशी चळवळ सुरू केली आहे. नवीन योजनेत ४ ट्रिगर कमी केलेआहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांनी पिक विमा भरणे बंद केल्याचे शेतकरीवर्गाचे म्हणणे आहे. ज्यामध्ये पावसाभावी पेरणी झाली नाही तरी विमा मिळण्याची तरतूद होती. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती २५% अग्रीम रक्कम बंद केली तसेच स्थानिक आपत्ती म्हणजेच उभ्या पिकात पावसाने नुकसान झाले तर पिक विमा मिळत होता. यासह काढणी पश्चात नुकसान म्हणजेच वैयक्तिक नुकसान भरपाई मिळत होती. हे महत्वाचे मुद्दे यासाठी कारणीभूत ठरले आहे.

संबंधित बातम्या