राज्यात अनेक महिन्यांपासून कृत्रिम फुलांचा वापर मोठ्या होत असून, मोठ्या प्रमाणात याचा फटका फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. त्याचे थेट पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटले, कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी विधानसभेत अनेक आमदारांनी केली. याप्रश्नी अधिवेशन संपण्यापूर्वी पर्यावरण मंत्री आणि आमदारांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा मंत्री भरत गोगावले यांनी सभागृहात ही घोषणा केली.
शहरात राज्यात अनेक समारंभात, लग्नकार्यात, मंदिरांमध्ये कृत्रिम फुलांचा अतिरिक्त वापर केला जात आहे. फुलांची बाजारपेठ उद्ध्वस्त होत चालली असून, त्याचा थेट फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. प्लास्टिक फुलावर बंदी घातली तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल.