बारामती : नगर परिषदेसमोर भिक मागो आंदोलन
बारामती नगर परिषद समोर भारतीय युवा पँथर संघटना आणि पथविक्रेते यांच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आलं आहे. पथविक्रेत्यांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. बारामती शहरात अनेक वर्षापासून पथविक्रेते व्यवसाय करीत आहेत. सदर पथविक्रेते यांच्यावर बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी कारवाईचा सपाटा चालू केल्यामुळे पथविक्रेते यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पथविक्रेत्यांना बारामती नगर परिषद हद्दीत व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी. अतिक्रमण विभागामार्फत पथविक्रेत्यांवर सुरू असलेली कारवाही तात्काळ स्थगित करावी. या मागणीसाठी आज बारामती नगरपरिषदेसमोर पथविक्रेते व भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने भिक मागो आंदोलन करण्यात आले आहे.