बारामती : नीरा डावा कालवा फुटला; पावसामुळे मोठे नुकसान
महाराष्ट्रात मे महिन्यातच पावसाने धुमाकूळ घातला असून राज्यभरात तुफान पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यातही पावसाचा जोर अधिक असून बारामती तालुक्यात काल भयानक पावसाने हजेरी लावली.
या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रचंड वेगाने नीरा डावा कालवा फुटला आहे. कालवा फुटल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती, घरे आणि रस्त्यांना याचा फटका बसला आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.