अमरावती:  मेडिकल कॉलेजच्या द्वितीय वर्षानिमित्त प्री-फॅब बॅरेक्सची पाहणी

अमरावती:  मेडिकल कॉलेजच्या द्वितीय वर्षानिमित्त प्री-फॅब बॅरेक्सची पाहणी
  • MG News
  • जून 20 2025

Share on  

मागच्या वर्षी  अमरावती  जिल्ह्यात सुरु  झालेल्या  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षाची तयारी सुरू झाली आहे. त्यानिमित्याने सुपर हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या प्री-फॅब बॅरेकमध्ये द्वितीय वर्षासाठी आवश्यक इमारतीच्या अनुषंगाने दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह या बॅरेक्सची पाहणी केली. याठिकाणी एमबीबीएसच्या द्वितीय वर्षासाठी मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी, फार्माकोलॉजी व फॉरेन्सिक मेडिसीन हे चार विभागाच्या अनुषंगाने किरकोळ दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात सुरू आहे. याठिकाणी एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला १०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे.  या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने सर्व सुविधा या कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत. परंतु, आता द्वितीय वर्षात पुन्हा १००  विद्यार्थी संख्या वाढणार आहे. नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने लवकरच आता शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील प्रवेशाला देखील सुरुवात होईल. त्यामुळे द्वितीय वर्षासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. एमबीबीएसच्या द्वितीय वर्षासाठी मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी, फार्माकोलॉजी व फॉरेन्सिक मेडिसीन हे चार विभागासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वापरात नसलेल्या प्री-फॅब बॅरेक्स उपयोगात आणण्यात येत आहेत. याकरिता शासनाच्या वतीने १४ फेब्रुवारी रोजी किरकोळ दुरुस्तीसाठी १ कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाला होता. त्या निमित्ताने पाहणी करुन आवश्यक चार विभाग कसे राहतील याची पाहणी करण्यात आली. एक महिन्याच्या कालावधीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम पूर्ण करावे लागणार आहे. अशी माहिती अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांनी दिली.

संबंधित बातम्या