बीड: जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; सरस्वती नदीला पूर

बीड: जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; सरस्वती नदीला पूर
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

बीड जिल्ह्यात दमदार झालेल्या मुसळधार पावसाने माजलगाव परिसरात हाहाकार माजला आहे. कोथाळा गावातील सरस्वती नदीला पूर आला असून पुन्हा जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार सुरू असलेल्या पावसाने सरस्वती नदी तुडुंब भरून वाहतेय. नदीला पूर आल्याने कोथाळा आणि सिरसाळा गावचा संपर्क तुटला आहे.

दरम्यान चांगला पाऊस झाल्याने परिसरातील खरीप हंगामाला मोठा फायदा झाला असून शेतकरी सुखावला आहे. जिल्हा प्रशासनाने दोन्ही गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या