बीड: नामांकित ३६ महाविद्यालयांना मराठवाडा विद्यापीठाचा दणका

बीड: नामांकित ३६ महाविद्यालयांना मराठवाडा विद्यापीठाचा दणका
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

 पिजी शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या मात्र सुविधा नसलेल्या नामांकित ११३ कॉलेजमधील पीजीचे ऍडमिशन थांबवण्याचा धाडसी निर्णय छत्रपती संभाजी नगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे.

यामध्ये बीड जिल्ह्यातील एकूण ३६ कॉलेजचा सहभाग असून, माजी मंत्री जयदत्त  क्षीरसागर, माजी मंत्री दिवंगत विमलताई मुंदडा, माजी आमदार भीमराव धोंडे, आमदार सुरेश धस, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आदित्य सारडा यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांचाही कॉलेजचा यामध्ये समावेश आहे.

विद्यापीठ प्रशासनाने प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी सर्व महाविद्यालयांची तपासणी केली होती. त्यात प्राध्यापकांची नियुक्ती न करणे, कागदपत्रे नियुक्त केल्यानंतर संबंधितांना वेतन न देणे, बायोमेट्रिक हजेरीसह भौतिक सुविधा नसताना, महाविद्यालय चालवीत असल्याचे दिसून आले. या कारणांमुळे १८७ पैकी मराठवाड्यातील ११३ कॉलेजची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. यामध्ये एकट्या बीड जिल्ह्यातील ३६ कॉलेजचा समावेश आहे. यामुळे कॉलेज आणि संस्थाचालकांना विद्यापीठाने मोठा दणका दिल्याचं बोलले जात आहे. 

संबंधित बातम्या