बीड : मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची भेट घेण्यासाठी अंबाजोगाईला जाणार - सुरेश धस
बीडच्या परळी मध्ये शिवराज दिवटे या तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्याची घटना घडली होती. यावर आता सुरेश धस यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे
परळी मध्येच असे प्रकार घडत आहेत. मारहाण करण्याची बोलण्याची जी पद्धत आहे ती संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली तसेच आहे
या प्रकरणातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. परंतु, पुण्यातील बोरसे प्रकरणात जशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेऊन कारवाई करण्यात आली तशी या प्रकरणातील आरोपीवर देखील केली जावी
शिवराज दिवटे यांच्या वडिलांना मी बोललो, ते आज मी शिवराज दिवटे यांची अंबाजोगाई येथे जाऊन भेट घेणार आहेत
बीड जिल्ह्यात वारंवार अशा मारहाणीच्या घटना घडत आहेत. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात जी पद्धत होती तसेच हे झाले आहे. काही लोक मदतीला आले म्हणून शिवराज दिवटे वाचला नसता त्याचे काही खरे नव्हते
पालकमंत्री अजित पवार उद्या बीड दौऱ्यावर येत आहेत. त्यांना या विषयावर बोलणार आहे
परळीतील एका टोळीवर काही दिवसांपूर्वीच कारवाई करण्यात आली तेच लोक महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी असू शकतात. त्या दिशेने देखील तपास व्हायला हवा
दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपीचे वाल्मिक कराड सोबत फोटो आहेत, त्यांनी गावोगाव अशी पोर तयार केली आहेत. हे सगळं एवढ्या लवकर थांबणार नाही