बेलापूर: गुगल मॅपच्या नादात कारसह एक महिला थेट पडली खाडीत

बेलापूर: गुगल मॅपच्या नादात कारसह एक महिला थेट पडली खाडीत
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

नवी मुंबईच्या बेलापूर येथून उलवे येथे जाणारी सुसाट कार थेट खाडीत पडल्याची घटना शुक्रवारी मध्य रात्री बेलापूरमध्ये घडली. घटनेच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी वेळीच कार मध्ये असलेल्या महिलेचे प्राण वाचवले. शिवाय क्रेनच्या साहाय्याने खाडीतून कार बाहेर काढण्यात आली आहे. दरम्यान, रात्री एक वाजण्याच्या सुमारास महिला तिच्या कारने उलव्याच्या दिशेने जात होती. मात्र, बेलापूर येथील खाडीपुलावर जाण्याऐवजी तिने पुलाखालील मार्ग निवडला. 
गुगल मॅपनुसार तिथे सरळ रस्ता असल्याचे तिला वाटले. मात्र, तिची कार थेट ध्रुवतारा जेट्टीवर खाडीत कोसळली. हा प्रकार जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनास आला. सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, महिला वाहून जात असल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित गस्ती व रेस्क्यू बोटीच्या साहाय्याने तिला वाचविण्यात यश मिळविले.

संबंधित बातम्या