भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला  मान्सूनपूर्व पावसाचा फटका : धान खरेदी केंद्रे ठप्प

 भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला  मान्सूनपूर्व पावसाचा फटका : धान खरेदी केंद्रे ठप्प
  • MG News
  • मे 28 2025

Share on  

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सध्या मान्सूनपूर्व पावसामुळे रब्बी हंगामातील धान खरेदीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. भंडारा  जिल्हा आणि लगतच्या  प्रदेशातील  46 हजार 277 क्विंटल धान खरेदी झाली आहे . मात्र पावसामुळे अनेक खरेदी केंद्रे सध्या बंद आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या काही खरेदी केंद्रांनाही याचा फटका बसला आहे. केंद्र बंद असल्याने,  शेतकरी धान साठवून ठेवत असून, खरेदी केंद्रे सुरू होण्याची वाट पाहत आहेत. काही शेतकऱ्यांचे धान ओले झालेले आहेत. ओले झाल्यामुळे तांदूळ  विकण्यायोग्य नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदी केंद्रे काही दिवसानंतर सुरु होणार होणार आहेत, अशी माहिती आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक संचालक नाशिक  दुदनाग  यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली .

संबंधित बातम्या