भंडारा : आदिवासी महिलांसाठी नव्या योजनांची तयारी – अशोक उईके
आदिवासी विभागांनं विद्यार्थी केंद्रबिंदू समजून भूमिका निर्माण केलेली आहे. तसा कृती आराखडाही तयार केलेला आहे. आदिवासी समाजातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगार मिळण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी अतिशय चांगली योजना भविष्यात आदिवासी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
शबरी आदिवासी घरकुल योजनेतील जे लाभार्थी आहे. ज्यांनी घरकुल बांधले आहेत, त्यांना शंभर टक्के निधी वितरित झालेला आहे. जे काही राहिले असल्यास त्यांना येणाऱ्या आठवड्यात निधी देऊ.
सोनझारी समाजातील नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, ही राज्य सरकारची भूमिका आहे. राज्यात ११ जात पडताळणी समिती असून जात वैधता समितीच्या माध्यमातून त्याचे काम सुरू आहे. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडे ही माहिती दिल्यानंतर त्यातील वास्तविकता शोधेल. कदाचित ते आदिवासी असल्यास निश्चितपणे त्यांना जात प्रमाणपत्र मिळेल. २३ मे २००२ चा कायदा अस्तित्वात आला, त्या कायद्याच्या अधीन राहून जातीचे प्रमाणपत्र देणे आणि वैधता प्रमाणपत्र देणे या कायद्यात राहून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.