तानसा धरण क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तानसा धरण ओव्हर फ्लो झाल्याने, तानसा धरणाचे ३८ स्वयंचलित दरवाज्या पैकी २१ दरवाजे उघडले गेल्याने, तानसा धरणातून २३२४६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग तानसा नदी पात्रात होत असल्याने पाणी पातळीत वाढ होऊन वज्रेश्वरी येथील तानसा नदी किनारी असणारी वैकुंठ धाम स्मशान भूमीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. दशक्रिया घाटाच्या पायऱ्या ही पाण्यात बुडाल्या आहेत.
भिवंडी आणि वाडा तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या वज्रेश्वरी तानसा पुलालगत पाणी पातळी वाढली आहे. तानसा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा जोर असाच कायम राहिल्यास पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन पुलावरील रस्ता बंद होण्याची शक्यता असल्याने गणेशपुरी पोलिसांनी सतर्कता बालगली असून, प्रशासनाच्या वतीने तानसा नदीकिनारी नागरिकांना सतर्कतेचा इशारा ही देण्यात आला आहे.