बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण यावर्षी सलग दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रासह पाटोदा परिसरात झालेल्या पावसाने बिंदुसरा धरणात पाण्याची आवक वाढलीय. मागील 20 दिवसात पावसाचा खंड पडला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला होता. मात्र सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने धरण ओसंडून वाहत आहे.
तर दुसरीकडे सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याखाली तरुणांचे अनाठाई धाडस दिसून येत आहे. दोन दिवस सुट्टीचे असल्याने धरण परिसरात पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था असणे आवश्यक आहे.