सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदावर भाजपचा दावा

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदावर भाजपचा दावा
  • MG News
  • जुलै 30 2025

Share on  

 सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सोलापूर शहरातील विकास कामाचा भाजप नेत्यांकडून झपाटा लावला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदावर भाजप पक्षाकडून आत्ताच दावा सांगितला जात आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूर शहर मध्यचे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून महायुतीतून भाजपचाच महापौर करण्याचा निर्धार केला आहे. सोलापूर शहर भाजप कडून महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

संबंधित बातम्या