चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपने पहिल्यांदाच सत्ता काबीज करीत आपला अध्यक्ष बसवला. रवींद्र शिंदे यांची अध्यक्ष, तर संजय डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
आज शिंदे यांच्या निवडीनंतर त्यांच्या अभिनंदनाचा कार्यक्रम बँकेच्या सभागृहात पार पडला. यावेळी आमदार कीर्ती भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची उपस्थिती होती. २१ संचालकांच्या या बँकेत भाजपने बहुमत मिळवले आणि चाळीस वर्षानंतर ही बँक ताब्यात घेतली. काँग्रेसने या निवडणुकीत गटबाजी सोडून काम केले. मात्र अपेक्षित यश मिळू शकले नाही. दरम्यान, आजच रवींद्र शिंदे यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.