किरीट सोमय्यांनी भोंगे मुक्त नाशिक संदर्भात आयुक्तांची भेट घेतली तेव्हा ते म्हणालेकि, भोंगा मुक्त मुंबई झाली, आता भोंगा मुक्त महाराष्ट्र होणार आहे. मी सकाळी संभाजी नगर येथे गेलो होतो आता उर्वरित ठिकाणी जाऊन भेट घेणार आहे. नाशिक पोलिसांनी सांगितलं सर्व भोंग्यांवर प्रतिबंध लावला आहे. तसेच नाशिकमध्ये बांगेवरून आवाज बंद झाला आहे. काही आठवड्यात पुढील भोंगे काढणार आहेत.
पुढच्या आठवड्यात नाशिक भोंगे मुक्त होणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले. त्याचप्रमाणे, देशात ध्वनी प्रदूषण कायदा आहे रात्री अकरा ते सकाळी ६ पर्यंत भोंगे वापरता येत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी चालेल मात्र त्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी यातून धडा घेतला पाहिजे असे किरीट सोमय्या म्हणाले.