नांदेडच्या भाजप नेत्यांना काँग्रेसची आणखी धस्ती आहे - रवींद्र चव्हाण 

नांदेडच्या भाजप नेत्यांना काँग्रेसची आणखी धस्ती आहे - रवींद्र चव्हाण 
  • MG News
  • मे 27 2025

Share on  

नांदेडच्या भाजप नेत्यांना काँग्रेसची आणखी धस्ती आहे - रवींद्र चव्हाण 

 भारतीय जनता पार्टी तर्फे गेली तीन चार दिवसांपासून काँग्रेसचे मराठवाड्यातले नेते हे अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत, असे लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यात आले होते. पण तसं न होता जे काँग्रेस सोडून आधीच भाजपमध्ये गेले आहेत त्यांचाच पक्षप्रवेश पार पडला. काँग्रेस आणखी तशीच मजबूत आहे, आमचे पदाधिकारी व कार्यकर्ते कुठेच गेले नसून त्यामुळे नांदेडच्या भाजप नेत्यांना काँग्रेसची धस्ती आहे, अशी टीका काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी भाजप वरती केली आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात अतिरेकी कुठे आहेत? त्याची माहिती सर्व जनतेला कळू द्या, त्यानंतरच शंखनाद सभा घ्या, अशा सभा घेऊन लोकांची दिशाभूल करू नका, असे देखील ते यावेळी म्हणाले. 

संबंधित बातम्या