बोरिवली पूर्व येथे देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

बोरिवली पूर्व येथे देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून भाजप कार्यकर्ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. मुंबईतील बोरिवली पूर्व या भागात देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोरिवली विधानसभेचे आमदार संजय उपाध्याय म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आम्ही सेवा दिवस म्हणून साजरा करतो. पूर्ण महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी संकल्प घेतला आहे की आम्ही रक्तदान शिबिर घेणार. सर्व मंडळात रक्तदान शिबिर सुरु आहे. सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी निरोगी राहावे, हसत राहावे, महाराष्ट्राचा विकास यांच्या हस्ते होत राहावा आणि आम्हाला त्यांचे मागर्दर्शन भेटत राहावं, जनतेचा आशीर्वाद नेहमी त्यांच्या पाठीशी असेल, अशा शुभेच्छा आमदार संजय उपाध्याय यांनी दिल्या आहेत.

संबंधित बातम्या