मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जन्मदिनी धुळ्यात रक्ताचा महाकुंभमेळा

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जन्मदिनी धुळ्यात रक्ताचा महाकुंभमेळा
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतील भाजपा एबी फाउंडेशन व विकी परदेशी ग्रुपतर्फे धुळे शहरातील विविध भागांतील ३३ ठिकाणी आज महारक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

रक्तदानाच्या या महायज्ञात शहरातील विविध भागांतील युवक-युवती महिला-पुरुषांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील सर्वच ३३ केंद्रांवर रक्तदानासाठी अक्षरशः रांगा लागल्याचे चित्र होते. यात दुपारी दोनपर्यंत तब्बल २८०० बाटल्या रक्तसंकलन झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत हा उपक्रम सुरु राहणार असल्यामुळे ४००० रक्ताच्या बाटल्यांचा संकल्प पूर्ण होणार असल्याचा विश्वास यावेळी विक्की परदेशी यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या