पुण्यातील खराडी येथे सायबर फसवणुकीसाठी चालवल्या जाणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी अमेरिकन नागरिकांना 'डिजिटल अटक'च्या नावाखाली फसवलं जात होतं. यामध्ये १०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकत पोलिसांनी ही कारवाई केली. खराडी येथे अद्यापही कारवाई सुरू आहे. २०० पोलिसांचा फौजफाटा सध्या तिथे उपस्थित आहे. आतापर्यंत १०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मॅग्नेटल बीपीएस अँड कन्सल्टन्सी एलएलपी नावाच्या या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना 'डिजिटल अटक' च्या नावाखाली फसवून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार सुरू होता. या कारवाईत १०० हून अधिक जणांना पकडण्यात आले. यामध्ये अनेक तरुणींचा समावेश आहे. पोलिसांनी ४१ मोबाईल, ६१ लॅपटॉप आणि इतर महत्त्वाचे साहित्य जप्त केले आहे.