नाशिकच्या इंदिरानगर परिसरात निर्घुण खून

नाशिकच्या इंदिरानगर परिसरात निर्घुण खून
  • MG News
  • सप्टेंबर 13 2025

Share on  

नाशिक मधील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत काल (12 सप्टेंबर) रात्री उशिरा खूनाची थरारक घटना उघडकीस आली. संतोष उर्फ छोटू काळे (वय 38, रा. वसाहत क्र. 1, लेखानगर) याचा निर्घृण खून झाल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष काळे हा गुरुवारी सायंकाळी साडेसहा-सातच्या सुमारास घरून बाहेर पडला होता. मात्र उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी रात्री इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असता गरवारे बसस्टॉप परिसरात तो गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. तपासात तो घटनास्थळीच मृत झाल्याचे निष्पन्न झाले.

प्राथमिक चौकशीत दोन अज्ञात व्यक्तींनी दगडाने वार करून संतोष याचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

रणजीत झापर्डे एमजी न्यूज  नाशिक

संबंधित बातम्या