बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाकडून नगरपरिषद वर घागर मोर्चा 

बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाकडून नगरपरिषद वर घागर मोर्चा 
  • MG News
  • मे 6 2025

Share on  

बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाकडून नगरपरिषद वर घागर मोर्चा 

  मागील पंधरा दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहराला होत असलेला पाणीपुरवठा हा दूषित असून यामुळे डायरिया - मलेरिया सारखे संसर्गजन्य आजारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मान्सून सुरू होत. असतानाही अजून पर्यंत शहरातल्या नाल्या त्यांची साफसफाई न झाल्याने त्या तुडुंब भरलेल्या आहेत. मलकापूर नगरपालिकेत कर आकारणी सोबत मासिक दोन टक्के शास्ती रक्कम आकारण्यात येत आहे. व ही अवैध सावकारी सारखे असल्यामुळे ते त्वरित रद्द करण्यात यावी. 

पंतप्रधान आवास योजनेत लाभार्थ्यांना अजूनही अनुदान मिळालेले नसल्यामुळे ते त्वरित देण्यात यावे.  अशा विविध मागण्यांकरिता आज मलकापूर येथील महिला घागर घेऊन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पदाधिकारी चक्क मलकापूर नगरपरिषद वर हल्लाबोल करीत तेथे मुख्याधिकारी व प्रशासक यांच्या समोर घागरी फोडण्यात येऊन प्रशासनाचा निषेध करण्यात आला. नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा, महिन्यात चार ते पाच वेळा पाणी देऊन संपूर्ण महिन्याची पानिपट्टी - हा अन्याय बंद करण्यात यावा. अशी मागणी आंदोलन करतानी केली आहे. 

अरुण अग्रवाल (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

संबंधित बातम्या