जालन्यात `मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र´ मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला असून, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले आहे. २२ जुलै ते २२ ऑगस्ट दरम्यान आरोग्य विभागाने राज्यभरात १ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. यात जालना जिल्ह्यासाठी १७४३ मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावयाच्या असून, मंत्री बोर्डीकर यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
दरम्यान मराठवाड्यातल्या आरोग्य विभागात रिक्त जागांचा आढावा घेतला जाणार असल्याचेही यावेळी मंत्री बोर्डीकर यांनी म्हटले आहे.