केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने नुकताच सीबीएससी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक केले असून नुकत्याच घेतलेल्या या निर्णयाची धुळ्यातील महापालिकेच्या शाळा क्रमांक ९ मध्ये अंमलबजावणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने घेतलेले या निर्णयानंतर शाळेत त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराने रेकॉर्डिंग मुख्याध्यापकांच्या दालनात होणार असून यासाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली आहे. शहरातील आणि जिल्ह्यातील इतर जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांमध्ये देखील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ बसविण्याची मागणी पालकांमधून होत आहे.