छ. संभाजीनगर : खते लिंकिंगची सक्ती करणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार अब्दुल सत्तार

छ. संभाजीनगर : खते लिंकिंगची सक्ती करणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार अब्दुल सत्तार
  • MG News
  • मे 11 2025

Share on  

छ. संभाजीनगर : खते लिंकिंगची सक्ती करणाऱ्यांवर कारवाई करा - आमदार अब्दुल सत्तार

          आगामी खरीप हंगामात बियाणे, खते, किटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध राहतील यादृष्टिने काटेकोर नियोजन करावे, तसेच गुणनियंत्रण विभागाने दक्ष राहून बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, खते लिंकिंग ची सक्ती करणाऱ्यांवर कारवाई करा. असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी आज दिले. सद्यस्थितीत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे करुन तातडीने शासनास अहवाल सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 
आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आज सोयगाव येथील कोविड सेंटर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक पार पाडली.
आमदार अब्दुल  सत्तार म्हणाले की, शेतकरी बांधवांना बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी कृषि विभागाने अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे. प्रत्येक गाव आणि शेतकरी पातळीवर नियोजन आवश्यक आहे. खते व बियाणे उपलब्धतेसंदर्भात ग्रामसभेच्या माध्यमातून माहिती देण्यासोबतच बियाण्यांची उगवण क्षमता तपासून त्याबाबत मार्गदर्शन करावे. कोणत्याही परिस्थितीत खते, बियाणे यांची टंचाई भासणार नाही, याबाबतची दक्षता घ्यावी. शेतकरी बांधवांची अडवणूक होऊ नये यासाठी खते, किटकनाशके यांची भरारी पथकाद्वारे तपासणी करावी. अनधिकृत व बोगस बियाणे, खते याबाबत गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यासोबतच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पीकविमा पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मे अखेर लाभ देण्यात यावा, स्व. गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजना अंतर्गत प्रलंबित प्रस्ताव निकाली काढून त्यांना तातडीने लाभ घ्यावा. असे आ. अब्दुल सत्तार म्हणाले.
खरीप पीक हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही. याबाबत दक्षता घेण्यासोबतच उपविभागीय अधिकारी - तहसीलदार यांनी पीक कर्जासंदर्भात तातडीने विविध बँकांसोबत बैठका घेऊन, पीक कर्ज वाटपाचा आढावा घ्यावा. तालुकानिहाय पीक कर्जाचे देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांच्या शेती पंपासाठी आवश्यक त्या प्रमाणात वीजपुरवठा होईल, यादृष्टीने विद्युत विभागाने नियोजन करण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिल्या.  
 

संबंधित बातम्या