येवला तालुक्यातील पुरणगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले असून यावेळी नाशिक - संभाजीनगर महामार्ग रोखण्यात आला. महामार्गावर यावेळी आंदोलनकर्त्यांनी पत्ते खेळत कृषी मंत्र्यांच्या फोटोला यावेळी शाही फासण्यात आली.
शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, पेरणी ते कापणी सर्व खर्च एमआरइजिएस मध्ये करावा, दिव्यांग बांधवांना ६ हजार रुपये मानधन मिळावे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या मागण्या मान्य कराव्या अशा विविध मागण्यासाठी प्रहार संघटनेकडून चक्काजाम करण्यात आले.