प्रहार संघटनेच्या वतीने ठिकठिकाणी आज चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. नागपुरात ऑटोमॅटिव्ह चौकामध्ये चक्काजाम करत आंदोलनाचा इशारा दिलाय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांगांच्या विविध मागण्यांना धरून बच्चू कडू यांचे टप्प्याटप्प्याने आंदोलन होत आहे.
यावेळी आंदोलकांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत डिटेन केल आहे. यावेळी प्रहारचे पदाधिकारी यांनी हातात फलक घेत घोषणा दिल्या.