उमरखेडमध्ये शेतकरी, दिव्यांग, राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तसेच प्रहार कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव यासह १७ मागण्यांवर तोडगा काढावा अशी मागणी लावून धरली. पोलीस प्रशासनाने आंदोलकांना स्थानबद्ध केले.