चंद्रपूर : "ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जल्लोष तिरंगा रॅलीद्वारे साजरा , ज्यातून देशभक्तीचे उत्कृष्ट दर्शन .

चंद्रपूर : 
  • MG News
  • मे 18 2025

Share on  

चंद्रपूर : "ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जल्लोष तिरंगा रॅलीद्वारे साजरा , ज्यातून देशभक्तीचे उत्कृष्ट दर्शन .

       भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर या यशस्वी मोहिमेनंतर देशभरात देशभक्तीची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये एक भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे नेतृत्व चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

या रॅलीत चंद्रपूरच्या सर्व धर्म, जाती व राजकीय पक्षांतील नागरिकांनी एकत्र येत देशप्रेमाचा संदेश दिला. शहराच्या विविध भागांतून तिरंगा हातात घेऊन निघालेल्या नागरिकांनी जय हिंद चा जयघोष केला. सर्व सामाजिक संस्था, संघटना आणि युवकांनी स्वतःचे बॅनर्स घेऊन मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले जेव्हा जेव्हा देशासोबत उभं राहायची वेळ येते, तेव्हा चंद्रपूर नेहमीच पुढे असते. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असून, चंद्रपूरच्या जनतेने मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन देशप्रेम व्यक्त केलं आहे.
 

संबंधित बातम्या