चेस वर्ल्ड कप चॅम्पियन दिव्या देशमुखचं नागपुरात जंगी स्वागत

चेस वर्ल्ड कप चॅम्पियन दिव्या देशमुखचं नागपुरात जंगी स्वागत
  • MG News
  • जुलै 31 2025

Share on  

नागपूरच्या दिव्या देशमुख हिने केवळ १९ व्या वर्षी जॉर्जिया येथे आयोजित फिडे महिला वर्ल्ड कप २०२५ मध्ये आपली चमक दाखवत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय ग्रँडमास्टर कोनेरु हम्पी हिला पराभूत करत दिव्याने केवळ वर्ल्ड कप जिंकला नाही तर ‘भारताची ८८वी ग्रँडमास्टर’ होण्याचा मानही पटकावला.

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दिव्या प्रथमच आपल्या शहरात परत येत आहे. यानिमित्त नागपूर विमानतळावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. दिव्याच्या स्वागतासाठी तिचे कुटुंबीय आणि चेस फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित आहेत. तसेच दिव्याच्या स्वागतासाठी ढोल-ताशा रॅली काढण्यात आली. 

संबंधित बातम्या