छ. संभाजीनगर : वक्फ संशोधन कायदा रद्द करावा या मागणिसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन
वक्फ संशोधन कायद्याच्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्डाच्या वतीने देशभर आंदोलन सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून ऐतेहासिक आमखास मैदानावर 25 मे रोजी सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत वक्फ संरक्षण काॅनफन्सचे आयोजन करण्यात आले आहे. वक्फ संशोधन लाॅ बोर्डाचे सदस्य हजरत मौलाना उमरैन महफुज रहेमानी, मौलाना यासिन अली उस्मानी बदायूनी, अॅड शमशाद, मौलाना रफीऊद्दीन अशरफी, मौलाना निजामोद्दीन फक्रुद्दीन, मलिक मोअतसिम खान, खासदार इम्रान प्रतापगढी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार संजय राऊत, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आमदार जितेंद्र आव्हाड, वंचितचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, खा.डाॅ कल्याण काळे, इम्तियाज जलिल, बामसेफचे वामन मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्डाचे सदस्य हजरत मौलाना मोईजोद्दीन कासमी, मौलाना महेफुजुर्रहमान फारुकी, इंजिनिअर वाजेद कादरी, जियाउद्दीन सिद्दीकी यांनी दिली आहे.