छ. संभाजीनगर : उपसभापती नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद

छ. संभाजीनगर : उपसभापती नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद
  • MG News
  • मे 16 2025

Share on  

छ. संभाजीनगर : उपसभापती नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद 
  सामाजिक न्याय विभागाला अधिक निधी मिळायला हवा होता. मात्र त्याबाबत आधी माहिती घ्यायला हवी. अपेक्षा ठेवायला हरकत नाही, विभाग अंतर्गत भाष्य करणे योग्य नाही. गरज पडल्यावर काही वेळा निधी वळवतो, आपण त्यात काही नवीन नाही.
  लाडकी बहिण योजनेत महिलांना दिलासा मिळाला आहे. प्रत्येक योजनेचा एक पैलू असतो, विरोधक अपप्रचार करत आहेत, जो निकाल लागला तो त्यांना पचत नाही, अपेक्षा भंग सहन होत नाही. सत्ता आल्यावर कोणाला कोणती पदे मिळणार हे देखील ठरवून मोकळे झाले होते. 
  संजय राऊत यांचे पुस्तक सिरियल प्रमाणे टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न आहे. ते काही स्वातंत्र्य लढ्यात जेल मध्ये गेले नव्हते. पुस्तकाचे श्रेय साक्षीदाराला द्यावे, मोठ्या नेत्याबद्दल ते बोलतील. बातमी देताना स्वतःची तुलना सावरकर यांच्याशी करतात ही दिवाळखोरी आहे. पत्राचाळ घोटाळ्यात काय केलं पहावे. असे प्रश्न विचारून त्यांच्या पुस्तकाचे प्रचार करणे चुकीचे. ज्या माणसाने गरिबांचे पैसे खाल्ले त्यांच्या बद्दल बोलणे चुकीचे. जो माणूस मनी लाँड्रिंग मध्ये आत गेला, त्याच्या वाक्याला महत्व नाही.
  आदित्य ठाकरे येणार आहेत, ते घरातच असतात. कधीकधी बाहेर येतात. महायुतीला मराठवाड्यात जो जनाधार मिळाला त्यानुसार कोण खर आहे ते कळते. त्यामुळे लबाड कोण हे कळत, विधानसभेत पराभव कोणाचा झाला ते स्पष्ट दिसून येतं. पाणी प्रश्नावर कोणामुळे विलंब होतो ते कळून येते. 
  पालकमंत्री निर्णय घेऊ शकतो, धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात, लोकांच्या कामासाठी ते करत आहेत.

संबंधित बातम्या