चोपडा : राष्ट्रीय डेंगू दिवस साजरा, जनजागृती व मार्गदर्शन

चोपडा : राष्ट्रीय डेंगू दिवस साजरा, जनजागृती व मार्गदर्शन
  • MG News
  • मे 16 2025

Share on  

चोपडा : राष्ट्रीय डेंगू दिवस साजरा, जनजागृती व मार्गदर्शन

        चोपड्यात आज राष्ट्रीय डेंगू दिवस नगर परिषदेच्या रुग्णालयात साजरा करण्यात आला. यावेळी डेंगू चे डासांची उत्पत्ती व त्या डासांचा उत्पत्ती पासून बचाव कसा करावा. या संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर व नगरपरिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला यांनी मार्गदर्शन केल. डेंगू झाल्यानंतर रुग्णांना त्याचे काय लक्षण दिसतात, आणि त्या लक्षणे दिसल्यानंतर तात्काळ वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घ्यावा असे सल्ले देण्यात आले. डेंगूचे डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी काय करावे, या संदर्भात देखील सविस्तर मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. नगरपरिषदेच्या रुग्णालयात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय डेंगू दिवसानिमित्त कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर व डॉ. चंद्रकांत बारेला जगदीश बाविस्कर यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. 

संबंधित बातम्या